प्रतिनिधीः पालघर जिल्ह्यात २०४ अवैध शाळा असून सदरच्या अवैध शाळांवर | कारवाई करण्याकरिता | मख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच तमाम विभागांना तक्रारी देऊनही अद्याप ठोस कारवाई केली जात नाही. १० अवैध शाळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर अवैध शाळांवर कारवाईची मोहीमथंडावलेली आहे. अवैध शाळांविरुद्ध कारवाई ही करावीच लागेल. वरून कितीही दबाव आला तरी कारवाई ही करावीच लागणार. अवैध शाळांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश शिक्षण संचालक पुणे यांनी दिले असतानाही जवळपास २ वर्ष कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत काही राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते, पत्रकार यांनी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज देऊन शाळेच्या व्यवस्थापकांना मॅनेज करून प्रचंड पैसे कमविले.. सदरबाबत तुफान एक्सप्रेसचे संपादक अनिल भोवड यांनी मुख्यमंत्र्यांसह तमाम संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांचाही नाईलाज झाला. आणि कारवाईचे आदेश दिले गेले.
अवैध शाळांविरुद्ध कारवाई का थंडावली?