प्रतिनिधीः भूमाफिया राकेश साकला याच्या अवैध बांधकामावर तोडक कारवाई करून एमआरटीपी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी ई प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्याकडे लिखित
करण्यात आली आहे. सदरबाबत त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी. निळेमोरे सर्व्हे नं. ३७ येथे राकेश साकला याने भव्य अवैध इमारतीचे बांधकाम केले आहे. सदरचे बांधकाम उभे कसे काय झाले? बांधकाम उभारले जात असताना महानगर पालिका अधिकारी काय झापले होते काय? या बांधकामाला संरक्षण देण्याकरिता २५ लाखांचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. ई प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त बुधाजी शेळके यांनी त्वरित या अवैध बांधकामावर तो डट कारवाई करून बांधकामधारक राकेश साकला याच्यावर एमआरटीपी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करावा. १५ दिवसात सदरची कारवाई न केल्यास पुढील कारवाई केली जाईल याची बुधाजी शेळके यांनी नोंद घ्यावी. रेती बंद असताना अर्थातच चोरीच्या रेतीवर सदरचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यामळे तलाठी, तहसिलदार यांनी रेतीचोरीबाबत कारवाई करावी.सदरबाबत कठोर कारवाई न केल्यास या बांधकामाला जबाबदार सर्वच जण बाराच्या भावात जातील यात शंका नाही.