वयोवृद्ध महिलेचा खून करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना राजस्थान येथून अटक

प्रतिनिधी/अनिल पगारेः _वयोवृद्ध महिलेचा खून करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना राजस्थान येथून अटक करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, द्वारकामाई हौ. सोसायटी, कैलास नगर रोड, लोणावळा, ता. मावळ येथे राहणाऱ्या रेशन पुरुषोत्तम बन्सल यांची राहत्या घरी दि. २.१.२०२० रोजी हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबरी चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती. रेशन पुरुषोत्तम बन्सल यांच्या घरातून २,८२,०००/- किमतीचा माल चोरी झाला.



_पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप _पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, लोणावळा सहा. पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस . निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस हवालदार जयराज पाटणकर, पो. ना. - वैभव सुरवसे, अमोल कसबेकर, पो. कॉ. पवन कराड, अजीज मेस्त्री, मनोज मोरे स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस गुन्ह शाखच सहा. पालास निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पो. हवा. पी. एस. वाघमारे, सचिन गायकवाड यांनी अत्यंत कौशल्याने तपास करून सर्व माहिती मिळविली व मिळालेल्या माहितीच्या आधारे अशोककुमार दलराम सरगरा, जगदिशकुमार नेमाराम जोदाजी, पिंटू _ तारारामजी सरगरा परमार या आरोपींना राजस्थान येथून अटक केली.