आपण आपल्या दनदिन जीवनात अश्या बऱ्याच गोष्टींचा वापर करत असतो ज्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. याची आपल्याला कल्पनाही नसते. अशाच एका गोष्टीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही पाणी पिण्यासाठी प्लास्टिकची बाटली वापरत असाल तर ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही प्लास्टिकची बाटली वापरणार नाही. चला तर जाणून घेऊयात प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी पिण्याचे दुष्परिणाम. प्लास्टिकची बाटल्या बऱ्याच रसायनांचा वापर करून बनलेल्या असतात.
जे बाटली मधील पाणी गरम होताच पाण्यात मिसळतात. आणि मग ही रसायने आपल्या पोटात पोहोचतात आणि पोटाचे आजार सरु होतात. प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिण्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. नवजात मुलाला, गरोदर स्त्रियांना, आजारी पेशंटला शक्यतो प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी देऊ नका. सतत प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिण्यामुळे दूषित घटक आपल्या पोटात जाऊ शकतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. प्लास्टिकची पाण्याची बाटली तुम्ही विकत घेतल्यावर ती बाटली पुन्हा पुन्हा वापरु नका. तसेच आपली पाण्याचा बाटला कामट पाणा, विनगर किंवा अँटीबॅक्टेरिअल लिक्विडने स्वच्छ ठेवत चला जेणेकरून पोटाचे आजार तुमच्यापासून लांब राहतील.