दोन ओळींची चिठ्ठी लिहून हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या.

ऑपेरा हाऊस येथील एका १५ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून मंगळवारी सकाळी हिरे व्यापाऱ्याने आत्महत्या केली. धीरेनभाई चंद्रकांत शहा असे ६१ वर्षीय हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र समजू शकले नाही.

नेपयन्सी रोडवरील मातृआशिष इमारतीत धीरेनभाई आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले. कार्यालय असलेल्या ऑपेरा हाऊस येथील १५ मजली प्रसाद चेंबर या इमारतीच्या थेट गच्चीवर गेले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी मारली. उडी मारल्यानंतर शहा जागीच मरण पावले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.