शिवजयंतीः झटपट न्याय, ४०० किल्ले, १०० देशांत जयंती... शेर शिवराज है!

जाणता राजा, रयतेचा राजा म्हणून जगभरात दरारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी रोजी (तारखेप्रमाणे) जयंती साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले. तरुणांची मोट बांधण्यासाठी शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली. शिवाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय होते. तरी त्यावर पाय रोवून उभे राहत महाराजांची स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांचे जीवन एका आख्यायिकेप्रमाणेच असल्याचे भासते. जाणून घेऊया शिवाजी महाराजांबद्दलच्या काही रंजक गोष्टी...