करोनाची भीती..

करोनाच्या संसर्गामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी न जाण्यासह अनेक आदेश चीन सरकारने नागरिकांना दिले आहेत. चीनमध्ये करोनामुळे आतापर्यंत १८०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. त्याशिवाय ७० हजारहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही उपाय संशोधकांनी सांगितले आहेत.