जगभरात 'इतकी' नववर्ष संवत्सरे; उद्या चैत्रारंभ!

हिंदू नववर्ष म्हणजेच चैत्र महिन्याचा आरंभ उद्यापासून होत आहे. मंगळवार, २४ मार्च रोजी दुपारी अमावास्या समाप्ती होत असून, चैत्र प्रतिपदेला प्रारंभ होत आहे. मात्र, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे बुधवार, २५ मार्च रोजी गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. हिंदू संस्कृतीनुसार, गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार हिंदू नववर्षारंभ करण्याची परंपरा आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. इंग्रजी कालनिर्णयानुसार १ जानेवारी रोजी नवीन वर्ष सुरू होत असले, तरी जगभरात विविध दिवशी नववर्षे साजरी केली जातात. जाणून घेऊया जगभरातील विविध नववर्षे आणि तिथी...